आठवणी
आठवणी
1 min
12K
आठवणी का ? सलत
राहतात काळजात,
करू म्हटलं डिलीट
तरी का ?हेलावतात.
गोड आठवण असे
सप्तरंगी सुखदायी,
कडू आठवण होता
अंतःकरणच खाई.
मोरपिशी स्पर्श देई
सुखकर आठवण,
हृत काळजीने खाई
नकाराची साठवण.
नैराश्याची आठवण
छाती खंबीर बनवी,
यशदायी आठवण
"अहं" भावना वाढवी.
आठवणी विचारांचं
जणू मुक्त प्रदर्शन,
दबलेलं,साचलेल
येई मनी उगवून.
कोन दृष्टीचा बदला
नजरेचा अलबेला,
चिंता विसरुनी मग
रंग दिसे मतावला.