कृष्णराधेय
कृष्णराधेय

1 min

11.7K
अवचित येता कृष्ण गोविंद राधा बावरि खुले,
प्रेममयी क्षण अबोल स्पर्श तनातनांवर फुले.
धुंद पाऊस फुलून जाता ओल्या माळा वरी,
एक होऊनी तन मन बरसे प्रीतीच्या त्या सरी.
सावळबाधा होता रंगा प्रेमातूनी सजे,
घनासोबती फुलराणीही आसमंतात नटे.
निळा सावळा रंगात रंग गुंफुन एकचि दिसे,
मंद कुंजनी कृष्ण राधेय रंग गुलाबी हसे.
भेट न होता श्री ची व्याकुळ बैसे निर्जन स्थळी
हरिची प्रतिमा बघता जाई आनंदूनी जळी.