STORYMIRROR

Mayuri Kadam

Classics

3  

Mayuri Kadam

Classics

संत कवयित्री

संत कवयित्री

1 min
11.9K

(सप्ताक्षरी कविता)

    

स्मरण स्त्री पर्वाचे

संत कवयित्रींचे,

स्मरण साहित्याचे

'हरि' भावाशयाचे


मुक्ताई, चांगदेव

गुरु-शिष्याची जोडी,

असे वेगळेपण

ना आढळे त्रिखंडी


मुक्ताई अभंगात

दिसे अध्यात्म ओढ,

उत्कट भक्तीभाव

स्फूर्ततेला ना तोड


कारुण्याची प्रतिती

नामाची जनी दास,

जाईजुईची वेल

पांडुरंगाची आस


अभंग कान्होपात्रा

घेई विठ्ठल धावे,

पराकोटीचा भाव

सूर स्पंदन पावे


लाडालिंबाई, भागू

बहिणाई निर्मळा,

सूत्र एक भक्तीचा

विठू लेकूरवाळा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics