STORYMIRROR

Sheetal Sankhe

Classics

4  

Sheetal Sankhe

Classics

सकाळ

सकाळ

1 min
26.7K





सकाळी उठल्यावर ...

शांत वातावरणात ,

पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत

 त्यांच्या बोलीभाषेचं कौतुक 

करायला आवडतं मला...


गारव्यासह उगवलेली पहाट

न्याहाळताना ...तो गारवा 

मनाला स्पर्शून सुखावतो अन्

 गदगद भाव सर्वत्र पसरतो...

ते मनापासून आवडतं मला...


नंतर पसरणारी सुर्याची लालीमा ...

पुर्व दिशेला झालेले केशर सिंचन

सोनसळी अनुभवायायला मिळाले की,

 दिवस सुरू होताना ...

खूप प्रसन्न वाटतं मला ...


सकाळी‌ शांत बसून थोडा वेळ

स्वत:त डोकावून पहायला ...

बोलायला ...स्वत:च्या

मनातील गुंजन ऐकायला 

खूप खूप आवडतं मला ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics