माझ्यातील ...तू....
माझ्यातील ...तू....
1 min
472
माझ्यातील ....तू....
चित्रित उमटत
आर्त रेखाटत जाते .
थांबत नाही कुठेही ...
उमगू देत नाही तुलाही ...
माझ्यातील ...तू...
अबोल राहूनही ...
बोलते मुकपणाने
अलवार भावनांचे तरंग
उठती हळूवारपणाने ...
माझ्यातील ...तू...
सुगंधित होऊनही
दरवळ लपवणे
छंद जणू जडलाय
तुझ्यात रममाण झालाय ...
माझ्यातील...तू...
नयनरम्य ,ह्रदयारविंद्य
जीवनसखा , जीव की प्राण
मुखोद्गत मंत्रमालाच
ईशस्तवन सुदैव
माझ्यातील...तू...
माझ्यातील...तू...