सरी
सरी
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
सळसळनाऱ्या सरींनी
आकाश हे धुंद झाले
वाऱ्यासंगे नाचणाऱ्या
तरु वेलींनी दुमदुमले
पावसाच्या सरींनी
हे वातावरण शहारले
मृदगंध मातीचे
मनामनात दरवळले
वीज कडाडुनी
अंधाराला दुभंगले
धरणीमातेची कोरड
दाह क्षणार्धात मिटवले
सरसर सरींनी
मनमयुरही नाचले
पक्षांसंगे बळीराजाला
धास्तावताना सुखावले ...!!!
अंकुरित होईन
असे बीज वदले ,
धरित्री मातेस ,
हर्षित करते झाले ...