हळवी प्रीत
हळवी प्रीत
जीव वर खाली होतो
भावनेच्या हिंदोळ्यावर ...
अलवार त्यात तू ...
कोरून ठेवलेला हृदयावर ...
अन मी नव्याने हळवी होत जाते .
तुझ्या जीवन प्रवासातील
सहप्रवासी आरूढ विश्वासावर
मी अन तू कोरीव शिल्प जणू
उरले भग्न अवशेष आज काळजावर ...
अन मी नव्याने हळवी होत जाते.
कितिदा यत्न ते धागे जोडुन
तुला प्रेमात गुंफण्यावर ...
तू वार केलेस जरिही ,
माझ्या नाजूक मनावर ...
अन मी नव्याने हळवी होत जाते .
संपून जाणं नात्यातील नातं
मलाच नामंजूर क्षणभर ...
तुझं अस्तित्व जपून ठेवत
उभी आयुष्याच्या वळणावर ...
अन मी नव्याने हळवी होत जाते .