माझा गाव
माझा गाव
1 min
208
माझा गाव किती सुंदर
त्यात गुंफले संस्कृती मोती
हि-या माणकांची झालर
अशी माणसांची नाती
प्रेम जिव्हाळा नांदत आहे
अशी सुखवस्ती चांगली
संस्कार गाणी गात आहे
अशी भविष्य सजली
परंपरा युगायुगांची ओळख
खास जपली आहे
गाव ते वेशीपलीकडे
शहराआड लपले आहे
आपलेपणा जगतोय तेथे
रोज रोज हे सांगतोय
नका सोडू गाव तुम्ही
ओसपणासाठी तोही घाबरतोय