STORYMIRROR

Sheetal Sankhe

Others

4  

Sheetal Sankhe

Others

रेड लाईट एरिया

रेड लाईट एरिया

1 min
558


झंकार गीत सजले होते 

घुंगरू मात्र थिजले होते


नजर झुकली माहिती होते

मन मारून साहिले होते 


बाजार भावनांचे भरले होते

नकळत कुणी अडकले होते


"स्त्री"त्वातील स्री म्हणून बेजार होते

शहारलेले "मी"पण, कधीच संपले होते


सांत्वनपर शब्द फक्त उरले होते

माडीवर "रेड लाईट एरीयात" बंदिस्त होते


सुटका नाही म्हणून आक्रंदत होते

त्यावर सौंदर्य लेपन झळकत होते 


ज्वलंत समस्यांचे

पांघरूण झिडकारत होते

आपलेपण नसतो कुठेही जगणं असे जगत होते


नि:शब्द होवून निर्विकार भावनांचे बळी देत होते

अर्थहिन जगणे, अर्थास हवाली करत होते...


कलंकीत वाटावे, कुणाच्या वाट्याला न यावे कधी

हेच रोजच्या अंधाराला करूणेने विनवत होते...!!!


कुणा कवी, लेखक, पत्रकाराच्या लेखणीतून रडवत होते

समाजहित कशात असावे ऊर बडवून मांडत होते...


अन्यायाची एक अनोळखी वाट बनण्यास रोखत होते मुकपणेच वाचा फोडून साद घालण्या समजावत होते


Rate this content
Log in