जय जिजाऊ
जय जिजाऊ
1 min
313
शौर्य गाथा सांगून
माऊली ती धन्य
जिजाऊ नाव तिचे
शिवबा रत्न मान्य
तोरण पताका लावून
स्वराज्य निर्मिती झाली
बळ एकवटण्यासाठी
माय संस्कारी प्रकटली
आब तिचा , मान तिचा
सन्मानात संयम किती...
शहाजींची सावली भोसलेंची
कर्तबगार सून होती... !!!
चपलख , आत्मविश्वासू
नेटाने प्रयत्न करत राहीली
शिवबासारखा पुत्र विश्वासू
राष्ट्रासाठी घडवून लढली
शिकवणूक मोलाची
तिची युगप्रवर्तक ठरली
अवघ्या सोळाव्या वर्षीच
थोरवी महाराजांची रचली ...!!!
जिजाऊ माऊलीस मानाचा मुजरा
शतशः नमन