भुतकाळ पलीकडे आता....
भुतकाळ पलीकडे आता....
तू आता भुतकाळ होत चाललास
मागचे सारेकाही पलीकडे गेले
दृष्टी पल्याड शोधूनही सापडणार नाही
असे भुतकाळ माझ्या अन् तुझ्या वाट्याला...
सहज विसरून चाललोय आपण
रेशमी भावनांचा गुंता झाला म्हणून...
की नियतीनेच तशी योजना केली म्हणून...
असे भुतकाळ माझ्या अन् तुझ्या वाट्याला....
क्षण क्षण जपलेले निसटून चाललेत
वाळूसारखेच होते का ते...
ह्रदयात वेडीप्रीत होती ना , संपली असेल का ...ती...म्हणून
असे भुतकाळ माझ्या अन् तुझ्या वाट्याला....
चल सोड आता विचार सारे...
सलगीनच वाट चालू ...अंतर जरी असले
ते राखून ही पलीकडले आठवणीत जपू...तुला अन् मला
असे भुतकिळ तरी आहे तुझ्या अन् माझ्या वाट्याला.