त्याचा सन्मान
त्याचा सन्मान
साजरा होत नसतो
त्याचा सन्मान
कारण, तोच बनतो नेहमी
भक्कम आधार
वेळोवेळी येणाऱ्या
अडचणींमध्ये
तो धीर-गंभीर राहतो
तो रडूही शकत नाही
कारण, तो पुरूष असतो
झिजला तरीही वाकत नाही
कुवत नसली तरीही सोशिक बनतो
धडपड, गोंधळ असला तरी दाखवत नाही
समजून घेतो तरीही, जतावत नाही
कारण, तो पुरूष असतो
मनमोकलून रडणाऱ्या तिला,
मनसोक्त हसणाऱ्या तिला,
कवेत घेताना वेगळीच ऊब देणारा
स्वत: त्या भावनांना उराशी दाबून ठेवतो
कारण, तो पुरूष असतो
पुरूष म्हणून पुरूषार्थ
निव्वळ प्रेमातच आहे, हे ज्याला समजतं
तोच खरा पुरूष सामर्थ्याने
सर्व नात्यांना त्याच्या खांद्यावर
उचलून धरू शकतो
कारण, तो पुरूष असतो