प्रेम
प्रेम
1 min
364
प्रेमात कधी रूसावं,
अन् नकळत हसावं,
प्रेम मात्र एकदा,
साऱ्यांनीच करून पहावं.
नाही मिळाले , तरी चालेल,
असे निस्वार्थ नातं जपावं.
हेवे नको, दावे नको.
अटीतटी झाली , तरी प्रेम .
फक्त जिवंत ठेवावं.
त्या नात्याने, कुणीही,
होरपळू नये, दुखावू नये.
सारेच सुखी होतील.
ह्या भावनेसाठीच झुझांव.
प्रेम कधीही, संपत नसाव,
प्रत्येक कृतीतून ,
ते दुणावत असावं.
प्रेमाचे कोडे सामंजस्याने,
गोड हळूवार उलघडावं.
हर क्षणी ते,
प्रत्येकानी द्विगुणित करावं.