पाऊसवेडा
पाऊसवेडा
1 min
13.9K
मी पाऊसवेडा, श्रावणीचा
तुझ्या माझ्या पहिल्या भेटीचा
मी पाऊसवेडा, गर्द नभाचा
तुझ्या आठवणींच्या मिश्र साच्याचा
मी पाऊसवेडा, चार थेंबांचा
तुझ्या ओंजळीतील ओलाव्याचा
मी पाऊसवेडा, ओल्या मातीचा
तुझ्या मनमोहित परिमलेचा
मी पाऊसवेडा, हिरवळीचा
तुझ्या गोजिरवाण्या सौंदर्याचा
मी पाऊसवेडा, इंद्रधनुचा
तुझ्या कुंचल्यांच्या रंग छटेतला
मी पाऊसवेडा,सरींनंतरचा
तुझ्या अधरांवरील राहिलेल्या मोत्यांचा
मी पाऊसवेडा, सोनेरी किरणांचा
तुझ्या कहणीत तुलाच शोधणारा.......