अंतर...
अंतर...
🎤तू तरंग पाण्यावरती....मी तोच ओसाड किनारा...।
तुझी धाव किनाऱ्याची...की क्षितीजाचा ध्येयवारा...।।
मी शोधतो का तुला.....पुरता ओंझळीत माझ्या....।
तू पहाट चांदण्यांची...मी आठवणींचा मंद वारा...।।
गरुडाचे पंख सखे तुझे....गगणाची झेप....।
माझ्या आयुषी सारे....अपूर्ण सर्व लेख....।।
ओढीची हाक तुझ्या....का कानी जात नाही....?
मग अबोल शब्दक्षणांची फक्त....निसटती मेख राही...।।