शतदा प्रेम करावे
शतदा प्रेम करावे
तुझ्या साधेपणावर
शतदा प्रेम करावे
भोळ्याभाबडा स्वभाव तुझा
किती तुझ्यासाठी झुरावे
नयन भरले प्रेमाने
शतदा वळुनिया पाहिले
प्रेम सख्या अंतरीचे
अंतरातच राहिले
शतदा प्रेम करावे
मैत्री च्या नात्यावर
खंबीरपणे सोबत उभे असती
एकटं सोडत नाही संकटात रस्त्यावर
वाटे मनाला राहून राहून
शतदा प्रेम करावे स्वत:वर
स्वत:ला समजून घेताना
आवडीनिवडी जपण्याची येते लहर

