तुला भेटण्याचा पाऊस
तुला भेटण्याचा पाऊस
तुला भेटण्याचा पाऊस
गुलाबी थंडीत पडतो आहे.
ओढ त्या गारव्याची मला
शहार अंगावर देत आहे.
तू भेटशील तो क्षण
नक्कीच मंतरलेला असेल.
स्पर्श प्रत्येक थेंबातून
बोलका झालेला असेल.
तुझ्या ओढीने मी आता
अविरत भिजत उभा आहे.
ओलचिंब माझं मन
तुझ्या हृदयात घर शोधत आहे.