करूया प्रेम दिन साजरा
करूया प्रेम दिन साजरा
तुला पाहता राणी माझा
जीव जडला तुझ्यावरी...
समजून घे इशारा माझा
तुच माझी प्रीत खरी.....//१//
मला पाहता खुलून येतो
सखे गुलाब तुझ्या गाली...
साद घालते मलाच राणी
तुझ्या ओठावरची लाली...//२//
मोह होतो तुला पहाता
नयनात लावले दिवे...
समजून घ्यावे राणी
मजला आता काय हवे...//३//
तुझ्या हास्यात गुंतलो मी
घेऊया प्रितीची गं मजा...
तुझ्याचसाठी आलो मी
नको देऊ आता सजा...//४//
तूच सांग कसे आता मी
माझ्या मनाला गं आवरू...
मीच झालो फांदी अन्
तू माझ्या पिरतीचं पाखरू...//५//
भेट घेण्या येतो आता
तुझ्याच गं मी घरा...
गोड गुलाबी स्वप्नातला
करूया प्रेम दिन साजरा...//६//
खेळ खेळूया प्रितीचा गं
दोघे रंगवू प्रिताचा विडा...
नाव जोडूनी माझ्या नावाला
हाती भरावा तू हिरवा चुडा...//७//