STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

4  

Manisha Wandhare

Romance

प्रेमरंग

प्रेमरंग

1 min
417


घे ना हातात हात ,

श्वासांना मिसळू दे श्वासात ,

क्षणात दाटून ये आभाळी ,

बरस मग लाजवूनी सरी,

चिंब ओठांची भरती,

वादळाचा आवेग किती ,

गुंग होई त्या भ्रमरात ,

उधळु चल प्रेमरंग जीवनात ...

असा हा ऋतू येऊ दे बहरात...

येईल फुलांना बहर ,

सुगंध दरवळेल चौफेर,

मोगरा लाजरा सजेल ,

हसु गुंफेल लाजेल,

आठवांना येईल जाग ,

प्रेमात रंगलेला रंग माग ,

छेड काढते गुलाब,

काट्यांचीही पर्वा नाही तुला,

आता ना माघार ,

तुझ्या सोबतीने चालेल ,

सप्तपदीची वाट ,

तुच् हवा सातजन्मात ,

उधळु चल प्रेमरंग जीवनात ...

असा हा ऋतू येऊ दे बहरात...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance