फूलू द्यावे...
फूलू द्यावे...
फुलू द्यावे मुलांना
अगदी नैसर्गिकपणे
नको लागायला त्यांच्या मागे
अट्टाहासाचे जिने...
का ? सुकर करत जावी
आपण त्यांची पायवाट
पडू दे पाऊल त्यांची
घेऊ दे उणेदुणे
तेव्हाच सापडेल त्यांना
त्यांच्या जीवनाची वादळवाट...
अरे असे करू नको हे होईल
अरे तसे करू नको ते होईल
होऊ द्या व्हायचं आहे ते
कुठे थांबतो काळ अन्
कुणाच्या दैव कळते काय होईल...
म्हणजे मी काही
प्रशिक्षण वगैरे देत नाहीये
सर्व करता करता
त्यांना बंदिस्त करत नाहीये...
मलाही वेळ लागला हे शिकायला बरं
ध्येय त्यांचं ते ठरवेल
आपण फक्त रस्ता
फुलू द्यावे मुलांना
अगदी नैसर्गिकपणे...
आज पडतील उद्या उठतील
तेव्हाच कळेल सारे
तुटणार नाही मग
एवढ्याशा वादळाने
झेलतील संकटे
भविष्याला फुटेल धुमारे
फुलू द्यावे मुलांना
अगदी नैसर्गिकपणे...
