STORYMIRROR

Kavita Pudale

Abstract

4  

Kavita Pudale

Abstract

देव शोधूया

देव शोधूया

1 min
42.1K


देव शोधूया, .भेटे तो !

मातापितात

चरणांच्या सेवेत.


देव शोधूया ', भेटे तो !

शोधूया माणसात

प्रत्येकांच्या हृदयात.


देव शोधूया ,भेटे तो !

शोधूया वृद्धात

तयांच्या वृद्ध सेवेत .


देव शोधूया ,भेटे तो !

अनाथ बालकात

निरागस हास्यात.


देव शोधूया ,भेटे तो !

मुक्या प्राण्यात

वसे तो प्रत्येक सजीवात


देव शोधूया ,भेटे तो !

शोधूया सृष्टीत

सृष्टीच्या कणाकणात .


देव शोधूया ,भेटे तो !

पानाफूलांत

सुमनातील सुगंधात


देव शोधूया, भेटे तो !

शोधूया स्वत:

आपल्या अंतःकरणात


देव शोधूया, न भेटे तो !

मंदिरात

वसे तो माणसाच्या हृदयात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract