देशभक्तीपर गीत
देशभक्तीपर गीत
1 min
9.3K
मातृभूमी मुक्त
होण्या सळसळले रक्त
त्या रक्तांनी लिहला
स्वातंत्र्यांचा ग्रंथ
मातृभूमी मुक्त
होण्या कुणी दिला पुत्र
त्या त्यागानी लिहला
स्वातंत्र्याचा ग्रंथ
मातृभूमी मुक्त
होण्या दिले सौभाग्य
त्या विरहांनी लिहला
स्वातंत्र्याचा ग्रंथ
मातृभूमी मुक्त
होण्या दिले बंधू
त्या अश्रूने लिहला
स्वातंत्र्याचा ग्रंथ
मातृभूमी मुक्त
होण्या दिले बालिदान
त्या बलिदानाने लिहला
स्वातंत्र्याचा ग्रंथ
मातृभूमी मुक्त
होण्या चढले फासावर
त्या देशभक्तीने लिहला
स्वातंत्र्याचा ग्रंथ