Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kavita Pudale

Others

3.6  

Kavita Pudale

Others

गड किल्ले

गड किल्ले

1 min
33.4K


शिवरायाच्या पदस्पर्शानी

पावन झाले गड किल्ले

त्या मातीचा लावूनी टिळा

जतन करू या गड किल्ले


शिवशंभू ना साक्षी ठेवूनी

निश्चयाचा अभिषेक करूनी

शपथ घेतली स्वराज्याची

अस्तित्व शिवाचे हृदयी ठेवूनी


कुल दैवत भवानी आई

देई विजयाची शक्ती

राही सदैव पाठीशी आशीर्वाद देई

जय भवानी राहो साऱ्यांच्या हृदयात


लढे शिवरायांच्या मावळ्यांची तलवार

जुलूमी राजवटीवर

जिंके किल्ले , फडके भगवा गगणावर

हिंदवी स्वराज्याचा भगवा ह्दयात ठेवूयात


समर्थ रामदासांनी

स्थापिले शक्तीस्थान

मारूती बल उपासनेचे प्राणप्रतिष्ठान

तयांच्या हृदयात असे राम ठेवू किल्ले ह्दयात


मावळयांच्या पराक्रमी

रक्तांनी , बलिदानांनी

जिंकले किल्ले पराक्रमांनी

शिवरायांच्या किल्ल्यांना ठेवू हदयात


शिवरायांचा प्रताप आठवूया

गड किल्ले जतन करूया

पुढच्या पिढीस शिवरायांचा आदर्श ठेवूया

नको व्यसन येथे गड किल्ल्यांचे पावित्र्य ठेवू हदयात


स्वराज्य मिळे आम्हा

रक्ताच्या थेंबाथेंबातूनी

त्या रक्ताची शपथ तुम्हा

गड किल्ले जतन करूयात


जसे मन पावित्र्ये ठेवूनी

जातो आम्ही मंदिरी

तसे जाऊ किल्ले दर्शनी

गड किल्ले मंदिर शिवरायांचे

शिवचरणी सारे नतमस्तक होऊयात


Rate this content
Log in