STORYMIRROR

Kavita Pudale

Inspirational

3  

Kavita Pudale

Inspirational

मी आज निश्चय केला .

मी आज निश्चय केला .

1 min
26.6K


मी आज निश्चय केला


आनंदाने जगायचे

झाले गेले सारे विसरायचे

पुन्हा नव्याने जगायचे

नसे पुन्हा हे जीवन ...


मनमुराद हसायचे

जीवन आनंदाने फुलवायचे

पुन्हा नव्याने जगायचे

नसे पुन्हा हे जीवन ...


मनमुराद रडायचे

दुःख आंतरी नसे ठेवायचे

पुन्हा नव्याने जगायचे

नसे पुन्हा हे जीवन ...


हृदय रिते करायचे

बोलून भार कमी करायचे

पुन्हा नव्याने जगायचे

नसे पुन्हा हे जीवन ...


प्रत्येक क्षण सार्थक करायचे

हे जीवन सार्थक करायचे

पुन्हा नव्याने जगायचे

नसे पुन्हा हे जीवन ...


मी आज निश्चय केला

सदैव आनंदी राहायचे

साऱ्यांना आनंदी ठेवायचे

नसे पुन्हा हे जीवन ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational