STORYMIRROR

Varsha Shidore

Inspirational

4  

Varsha Shidore

Inspirational

पुस्तकांची सफर....

पुस्तकांची सफर....

1 min
568

खेळूया बागडूया पुस्तकांच्या या दुनियेत

नवनव्या पुस्तकांशी करूया मैत्री 

सज्ज होऊया अनुभवायला सफर ही पुस्तकांची... 


कितीही वाचले, लिहिले तरीही 

या रंगेबेरंगी पुस्तकांची किमया कळत नाही   

मग करूया धमाल थोडी शब्दकोड्यांशी, विनोदांशी... 


लेखकांशी मैत्री शिक्षकांशी गट्टी 

धड्यांशी मैत्री चित्रांच्या पंगती 

कथांशी मैत्री मित्रांच्या संगती... 


प्रश्नोत्तरे सोडवूया, कारणे देऊया

चित्रे रंगवूया, जोड्या जुडवूया

हसत खेळत पुस्तकांशी मैत्री करूया...  


पुस्तकांच्या बागेत जाऊया 

गोष्टी, कथा-कादंबरीशी मने जुळवूया 

व्यक्तिचित्रे रेखाटू, स्नेहसंमेलने भरवूया 

नाचू गाऊ अन पुस्तकांशी बागडूया... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational