देहबाजार सरणावरचा
देहबाजार सरणावरचा


आज अंगणात देहबाजाराच्या
एक वेगळाच परिपाठ होता...
जगण्यासाठी संघर्षाचा मार्ग
तुम्हां-आम्हांपेक्षा वेगळा होता...
लंगड्या विचारांआड लपून
एकीकडे वासनेचा हाव होता...
दुसरीकडे मात्र तोंड दडवलेला
सज्जनपणी भिकार आव होता...
दगडाच्या देवाला पुजणाऱ्यांना
देह व्यापार का रे वाटत होता... ?
अरे, माणसासारखी माणसंच ती
तरीही वागणुकीत भेद होता...
या संस्कृतीच्या भेदरटपणाचा
काळिमा कुत्सित नजरेत होता...
समाजाच्या अविचारी मुसक्यांना
तो चार भिंतीत का कोंडत होता... ?
कळलंच चुकून दुर्बुद्धीने म्हणा
देह सरणावरती तडफडत होता...
माणसाला माणसासारखं वागवा
शेवटी एकंच टाहो फोडत होता...
सेक्स रॅकेट चालवणं गुन्हा आहे. परंतु वेश्या असणं नव्हे ! Just RESPECT a HUMAN not a GENDER only