जन्म तुझा...
जन्म तुझा...


गोंधळात बावरलेला
कधी रुसलेला अन्
कधी क्षणात फुगलेला
आनंदात आसुसलेला !
रंगीन अंगणातल्या
फुलांसम बहरलेला
जन्माचा मधुर गोडवा
अंतर्मनी धुंद झालेला !
शब्द शिंपल्यातल्या
मोतींनी सजलेला
आजही आठवणींच्या
सोहळ्यात रमलेला !
जन्म तुझा आठवावा
एका घरच्या मुलीचा
एखाद्या राजराणीचा
फुलता दिन नवलाईचा !