वंदन भारत देशा !
वंदन भारत देशा !


दोनशे वर्षांच्या गुलामगिरीतून
मुक्तता स्वातंत्र्याच्या वारसदारांना !
आज ब्रिटिशांच्या जुलूमशाहीतून
अर्पण समाजकारण भारतीयांना !
लोकशाही जनमनात रुजताना
न्यायव्यवस्थेची वंदना कायद्यांना !
सार घटनेचा उच्च लिखित सरनामा
फलित यशाची पताका प्रयत्नांना !
पोपटपंची कायदे नि बोलबाल्यापेक्षा
कृतीचा रंग संविधानाच्या तत्वांना !
स्त्री-पुरुषी भेदभावाची झळ नको
सुज्ञ नागरिकत्वाच्या अधिकारांना !
स्वातंत्र्
यदिनी ध्वजरूपी वंदन करते
स्वातंत्र्य प्राप्तता स्वतंत्र विचारांना !
मार्गदर्शक तत्वे देशाच्या उन्नतीला
धर्म माणुसकीचा गौरवगाथांना !
लोकशाहीची हीच खरी आदरांजली
सीमेवरल्या वीर, शहीद जवानांना !
माझ्या स्वप्नातला भारत जाणावा
एकसमान हक्क देता नागरिकांना !
देशप्रेमी भारत विविधतेत एकतेचा
संदेश देशनिष्ठतेच्या जाणिवांना !
संगठित भारत मातेला गोंजारणारे
एक राष्ट्रगान अगणित हृदयांना !