लेखणी प्रेम...
लेखणी प्रेम...
1 min
467
प्रिय लेखणीला माझ्या
धार शब्दांची बलवान
उमगलेल्या ओळींत
भाव हळवा आलिशान !
शब्द माळीत धावे संगे
उसंत नव ध्येयाची घेऊन
ब्रेक तिचा नसे फुलस्टॉप
म्हणे कॉमा वाच सांभाळून !
जणू विसरते मी मलाच
तिच्या एकांती विश्वात
अस्तित्व माझ्या असण्याचं
गुंफत निळ्या विचारांत !
अशी प्रेमात ती माझ्या
की मी तिच्या घायाळ
कसं वर्णावं शब्दात
माझ्या लेखणीचं मायाळ !