सकारात्मकता...!
सकारात्मकता...!
झुंजूमंजूची वेळ
मी हात पसरून उभा होतो
पहाट पारी मनमौजी पक्षी
आकाशातून लगबगीने जात होता
त्याने मला पाहिले
आणि जाणले सारे
जाता जाता त्याने अलगद
माझ्या हातावर एक
शुभकांमनांचा पंखपिस सोडला
आणि
गोड मंजुळ अवीट आवाजात
हळुवार गुंजन करीत म्हणाला
आपल्याकडे जे विपुल असत
तेच आपण देत असतो
कारण
शेजारचा आपल्या दारात
जेव्हा कचरा टाकतो
तेव्हा वाईट वाटत
आपण आपल्या बागेतली
त्याच्या दारात फुल टाकावीत
आपल्याकडे चांगलं असत ते
नेहमी देत जावं
म्हणून माझ्याकडे
आशीर्वादाचे पंख आहेत
त्यातलच एक पिस
आशीर्वाद म्हणून तुला मी देतो
मार उन्नत उज्वल उंच भरारी
आणि घे श्रमाने यश कवेत
सोडून टाक नकारत्मकता
आणि हो सज्ज
जीवनास समोर जायला धैर्याने
यश तुझेच आहे
हाच माझा आशीर्वाद तुला आहे
मी अलगद पिस हाती घेतले
आणि नव्या उमेदीने कामाला लागलो...!