स्वप्न..!
स्वप्न..!
सहज वामकुक्षी घेताना
सुखद डोळा लागला
आणि हा भोळा जीव
शर्यतीचा खेळ पाहू लागला
शर्यत कसली
आपल्याच लोकांशी करायची
म्हणून ऐरावत ब्रह्मांडी
सराव करण्या बाहेर पडला
पण इथे माघारी
उपहास होऊ लागला
धावत्या ऐरावताचा
हेवा वाटू लागला
तो मदमस्त ऐरावत
आपल्याच मस्तीत जाऊ लागला
तसा तळपायाचा पारा
कुत्र्यांचा चढू लागला
सारी भुंकत भुंकत
शर्यतीस येऊन ठेपली
शर्यत सुरू होताच
जीव तोडून पळू लागली
ऐरावत लीलया
आपल्याच धुंदीत धावू लागला
तसा कुत्र्यांचा भ्रम निरास होता
ऐरावत अजिंक्य ठरला
तेंव्हा हलकेच जाग येता
कुत्री भुंकताना पाहिली
हत्तीच्या मोठे पणाची
खात्री सहजी मनास पटली...!
