घाबरट...!
घाबरट...!


तीस डिसेंबर 2023...!
घाबरट....!
घाबरट कारे तू
उबदार गोधडी ओढून निमलास
माझ्या साठी नाही देवा
असा कसा रे नाही थांबलास.…?
आकाशाची निळाई सोडून मागे
गर्मी घेऊन आज पळालास
कधी नव्हे ते आज देवा
धीटपणाचा रे बाबा कळस केलास...!
मला वाटते तुला पण वेड्या
एकतीस डिसेंबरचे वेध लागले
नको लागू बाबा नादी कोणाच्या
भले भले ते केंव्हाच शमले....!