माझी मला मी आज कळले
माझी मला मी आज कळले
माझी मला मी आज कळले
क्षितिजाकडे नव्याने मी वळले
पंखांना देवून नव्याने बळ
जगण्याची सुरू केली नवी कळ
विश्वास जागवून ठेवले
पाऊल पुढे हिम्मतीने
पाहते जगाकडे पुन्हा
मोठ्या गमतीने
डोळ्यात नवी नवलाई घेऊन
पाऊल टाकले जोशात
झुगारुन दिले जगणे जे
गुरफटले होते कोशात
