Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

kishor zote

Action

4  

kishor zote

Action

बाप माझा ( अभंग रचना )

बाप माझा ( अभंग रचना )

1 min
833

बाप माझा 

( अभंग रचना )

कल्पवृक्ष छाया I आई परी माया I 

झिजवितो काया I बाप माझा ॥ १ ॥

तक्रार ती काही I कधीच ना करी |

राबी घरी दारी | दिन रात ॥ २ ॥

वेळ मला झाला I येण्या घरा जर I

रस्त्याला नजर I शोध घेई ॥ ३ ॥

डोळ्यातील अश्रु I दाखवी ना कसा I

पाठी उभा असा I तो खंबीर ॥ ४ II

वाटतो नेहमी I धाक तो बापाचा I

झरा तो प्रेमाचा | नित्य सदा ॥ ५ ॥

नातवांना घेई I खेळाया नेतसे |

लहान होतसे | त्यांच्या सवे ॥ ६ ॥

सवय घराला I जडलीय त्याची I 

अस्तीत्व वास्तूची I तोच असे ॥ ७ ॥

घराची काळजी | आजही वाहता |

कधी ना थकता I उभा राही ॥ ८ ॥

वय जरी झाले | कणखर बाणा |

झुकल्या ना माना I त्या आमच्या ॥ ९ ॥

बापाची ती जागा | घेईना कोणीच I

हृदयात असाच | चिरकाल ॥ १० ॥

Rate this content
Log in