पलायन
पलायन
आणि शेवटी आज
मी पलायन केलं..
"जातीनं बरबटलेल्या मातीतून,
माजलेल्या असहिष्णु धर्मातुन,
गंजलेल्या नर सत्ताकतेतून,
धर्मलेल्या-कर्मकांडातून,
सुजलेल्या भांडवल शाहीतून,
हिन्दू...
मुस्लिम...
शीख...
ईसाई...
हर एका बंदिस्त वर्गातून,
भगवा...
हिरवा...
निळा...
पिवळा...
घोंगवणाऱ्या या पताकांच्या
अधर्मप्रणित वादळातून,
राजकारणातील गुंडांच्या
झुंडशाहीतून,
सत्तेच्या धुंदशाहीतून,
बाबा भटांच्या वासाडलेल्या
स्त्रिभोग प्रवृत्तितुन,
.
.
.
.
हुंकारलेल्या
मनुवादाच्या पारायनातून...."
आणि.....
"संविधान पोटाशी धरलं...!"
साचेबद्ध जगण्याच्या
उसण्या कुबड्या
बाजूला फेकल्या..
"तेव्हाच मी माणूस झालो..!"
विरक्त...मी....
विमुक्त..मी....
विद्रोही ..मी...