STORYMIRROR

Manisha Potdar

Action Inspirational

5.0  

Manisha Potdar

Action Inspirational

भरारी

भरारी

1 min
41.5K


तु मारली भरारी गगनाला

घाबरली नाही तु मरणाला

शुरवीर तू विरांगणा

अलिंगण दिले तु मरणाला

तु मारली भरारी गगनाला

ध्येय तुझे महान या जगतात

जिद्द तुझी अभ्यासाची खरी

वाढवली शान देशाची खरी

सोडुन मोह माया प्रेमाला

तु मारली भरारी गगनाला

तु राखला स्री जातीचा मान

अंतराळात शोधाया निघाली खाण

निघाली देशाची घेउन आन

घेउन गेली यान अवकाशाला

तु मारली भरारी गगनाला

धडा दिला तु धाडसाचा

साकार करु आम्ही तुझे स्वप्न

घेउन झेप विशाल गगनाला

अंतराळात तु मुक्काम ठोकला

तु मारली भरारी गगनाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action