STORYMIRROR

Manisha Potdar

Tragedy

4  

Manisha Potdar

Tragedy

बालसुरक्षा

बालसुरक्षा

1 min
310

समाजात आई आहे अस्वस्थ

सुरक्षा नाही घरी दारी बाळाला

विश्वास ठेवावा कोणावर समाजात

समजत नाही प्रत्येक आईला


बालक, बालिका व्हावे सुरक्षित

लैंगिक अत्याचाराला बसावा आळा

करावा नाश पोलिसांनी गुन्हेगारांचा

पापी घाव घालतो निर्मळ बालकाला


निसर्गाच्या उलट चालतो हा नराधम

त्याचा व्हावा नाश वाटते समाजाला

पोलिसांनी ठेचावं ह्या नराधमांना

सोडू नाही मोकळे अशा नराधमाला


कधी कधी कुंपणच खातं शेताला

म्हण घ्यावी आपण अभ्यासाला

प्रतिबंधक उपाय राहीला आता एकच

डोळ्यात तेल घालून सांभाळा बाळाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy