मनातले भाव
मनातले भाव

1 min

21.8K
मनातले भाव
मनात राहिले
वेदना या माझ्या
कोणी ना पाहिले
सांगायचे होते
खुप मनातले
ओठात ते सारे
आजही गुंतले
का कळेना तुला
भाव डोळ्यांतला
ऐक ना एकदा
आवाज आतला
मनातले भाव
मनात दाटले
विरहात तुझ्या
आसवं आटले
कोणास सांगु मी
मनाची वेदना
हृदय थांबते
दूर तू जाताना