STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Others

2  

Vasudeo Gumatkar

Others

गझल

गझल

1 min
283


किंमत तुला वनांची कळणार आज नाही

संकट अता उद्याचे टळणार आज नाही


येवो अता कितीही वाटेत वादळे ती

पाहून संकटांना पळणार आज नाही


कळला सखे मलाही तो अर्थ जीवनाचा

मदिरेकडे पुन्हा त्या वळणार आज नाही


शिक्षा कठोर द्यावी आता नराधमाला

वाटेत मग मुलीला छळणार आज नाही


जाऊ कसा सखे मी सोडून प्राण माझा

चिंतेत देह तुझिया जळणार आज नाही


Rate this content
Log in