STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Classics

2  

Vasudeo Gumatkar

Classics

निसर्गाशी मैत्री करू

निसर्गाशी मैत्री करू

1 min
1.5K

चला संकल्प नव्याने

सर्वजण आता करू

जोडू नवी नाती आता

निसर्गाशी मैत्री करू


ठेवू निसर्ग सुंदर

चला सफाई करुया

शाळा, रस्ते, परीसर

स्वच्छ आपण करूया


वृक्ष रस्त्याच्या कडेने

आज मोठमोठी लावू

पुन्हा पर्यावरणाला

खूप सुंदर सजवू


वृक्ष आहेत आपली

मित्र आयुष्यभराचे

देती गोड फळे, फुले

अन मंत्र जगण्याचे


जीवनाला फुलविण्या

करू मैत्री निसर्गाशी

त्याला फुलवू प्रेमाने

केला निर्धार मनाशी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics