"कविता"
"कविता"
अशी कशी कविता
सहजासहजी बनेल
एका निवांत क्षणी
कविता मनातून द्रवेल
उंचबळून येतील जेव्हा
भावभावना
तेव्हा म्हणावे लागणार
नाही कविते मला पाव ना
वैयक्तीक असोत की
सुखदुखे समाजाची असोत
कविता म्हणते
माझ्याव्दारे प्रकटोत
येवून जातात थोडक्यात
कवितेत नवे जुने संदर्भ
कोणकोणती कविता
बनते कमालीची भावगर्भ
कविता देत राहाते
उपेक्षीतांना दिलासा
म्हणूनच कवितेचा सहवास
वाटतो हवाहवासा