मी अमर शहिद झालो
मी अमर शहिद झालो


'आई' तुझा मुलगा म्हणून
जन्माला आलो ,
आणि भारताचा पुत्र म्हणून
शहिद झालो,
'आई' मी अमर शहिद झालो.....
'आई' तू मला दूध-भात भरवताना
मी तुला घरभर पळवायचो,
आणि आज त्या निष्ठूर अतिरेक्यांपासून
नाही माझा पळ काढू शकलो,
'आई' मी अमर शहिद झालो.....
'आई' निघताना तू बोलली होतीस,
बाळा काळजी घे ! व्यवस्थित जा!
माझी प्राणज्योत मावळते वेळी
माझ्याजवळ होती ती फक्त भारत माँ!
तुझं स्वप्न होत मी जवान झालो....
'आई' मी अमर शहिद झालो......
'आई' मी गेल्यानंतर ,
कुटुंबावर सगळा काळोख आहे
तुझा जीव माझ्यात असला तरी
आज तू तुझ्या पोरावीन पोरकी आहेस,
तुझ्या पोटी जन्म घेऊन मी धन्य झालो....
'आई' मी अमर शहिद झालो......
जन्मोजन्मी आई मला
तूच हवी आहेस,
माझा पुढचा जन्म ही आई
तुझ्याच पोटी असुदेत,
आणि
भारतमातेचाच पुत्र म्हणून होऊदेत
आम्ही सर्वजण तुमच्यासाठी वतनवाले झालो....
'आई' मी अमर शहिद झालो......