पहिला स्पर्श
पहिला स्पर्श

1 min

14.6K
बालपण-
नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा
उराशी बिलगलेल्या त्या चिमुकल्या ओठांचा
बोबड्या आवाजात पापा घेण्याचा
घट्ट मिठीत आपल्यालाच कवेत घेण्याचा
तारुण्य-
कुठल्यातरी कारणास्तव प्रथमच हात मिळवल्याचा
तर कधी चुकून अथवा जाणूनबुजून स्पर्श झाल्याचा
एखाद्या भेटीत प्रथमच हातात हात मिळवत चालण्याचा
आयुष्यभर साथ देईन म्हणून दिलेल्या सांत्वनाचा
लग्न-बेडी-
त्या पहिल्या हळुवार आणि नाजुक चुंबनाचा
सकाळी तिच्या ओल्या केसांच्या वेगळ्याच सुगंधाचा
दिवसभराच्या सर्व कामानंतर एकत्र एका विसाव्यात बसल्याचा
कुटुंब सांभाळताना क्षणिक दुःखाचा, अमर्याद आनंदाचा
उतारवय-
नुकत्याच सुरकुत्या पडत चाललेल्या त्या बदलाचा
सावरण्यासाठी हातात पडलेल्या आधाराचा
शेवटाला फक्त उरलेल्या बंद आठवणींचा
आणि ज्योत मावळून गेलेल्या त्या देहाचा