STORYMIRROR

Smita Deshpande

Classics

4  

Smita Deshpande

Classics

रम्य सहवास.

रम्य सहवास.

1 min
28.4K


खूप काही नको

आयुष्या तुझ्या कडुन

बस एक हाथ दे

पाठीवरून फिरणारा 

मायेचा स्पर्श दे


खूप काही नको

आयुष्या तुझ्या कडुन

बस एक साथ दे

खाचखळग्यांच्या रस्त्यात

चालायला आधार दे


खूप काही नको

आयुष्या तुझ्या कडुन

बस एक शब्द दे

कौतुकाने बोलणारी

फक्त प्रेमाची हाक दे


खूप काही नको 

आयुष्या तुझ्या कडुन

फक्त एक जीव दे

मोहमायेच्या दुनियेत

बस खरा चेहरा दे


खूप काही नको

आयुष्या तुझ्या कडुन

बस एक क्षण दे

स्वर्गातील सुख देणारा

रम्य असा सहवास दे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Smita Deshpande

Similar marathi poem from Classics