STORYMIRROR

UMA PATIL

Inspirational Classics

2.8  

UMA PATIL

Inspirational Classics

नातेसंबंध

नातेसंबंध

1 min
29.6K


नात्यांची वीण असते नाजूक 

नात्यांना जपावे लागते खूप

तुटेल इतके ताणू नयेत संबंध 

नेहमी जपावेत नात्यांचे बंध

चूक जर झाली असेल दुसर्याकडून 

लगेच द्यावी माफी तुमच्याकडून

जर तुम्ही चुकला असाल

तर माफी मागावी खुशाल

तेच रटाळ गाणे वाजवू नये 

नेहमीचे रडगाणे गावू नये

करू नये भांडण तंटा

नाहीतर वाजेल धोक्याची घंटा

थोडे तुम्ही समजून घ्यावे

थोडे त्याला समजू द्यावे

कधी तुम्ही माघार घ्यावी

कधी त्याने नमतं घ्यावं

बोलू नये कधी खोटे 

नाहीतर होतील तुमचे तोटे

खरं खरं सांगावं खरं खरं वागावं

खऱ्यातच नात्यांचं खरेपण जपावं

दुसऱ्याला टोचेल इतके बोलू नये

अहंकारात माणुसकी तोलू नये

मन मानेल असे वागू नये

तोऱ्यातच जगणं जगू नये

कधी आलाच राग

तर ओकू नये आग

रागाने तापवू नये डोकं

नाहीतर रागीट म्हणतील लोकं

होऊ नये नाराज, तोडू नये मने

यालाच म्हणतात एकमेकांना जपणे

नाराजी पचवावी, दुःख गिळावे 

नात्यांचे सुख प्रेमातच मिळावे

मजेत राहावं आणि मजेतच जगावं

अर्ध्या भरलेल्या पेल्याकडे बघावं

प्रत्येकाची जिंदगी असते खास

म्हणून माणसाने जगावे झकास



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational