स्वच्छतेची नाती (कविता)
स्वच्छतेची नाती (कविता)
झाडीला रस्ता
खराटा घेऊनी हाती
मनाच्या स्वच्छतेवर
किर्तनातून गाजवल्या राती
समाज मनात पेटविल्या
स्वच्छतेच्या ज्योती
तुडविल्या समाजाच्या
जुनाट रीती भाती
नाही होऊ दिली
समाजाची माती
ठेवून फुटके मडके माथी
घेऊन झाडू हाती
प्रबोधनास दिली गती
माणसाशी मानवतेची
जोडीली अतूट नाती
आज आठवूनी तुम्हां
सारे स्वच्छतेची गाणी गाती