कोकण भूमी (अभंग)
कोकण भूमी (अभंग)
1 min
509
वळणाची वाट।उतरता घाट।
निसर्गाचा थाट । कोकणात ।।
हापूस पायरी । नारळ सुपारी।
नभात भरारी । घेती वृक्ष ।।
खडक तो जांभा । करी भिंत उभा ।
कौलारूंची सभा । छतावरी ।।
अरबी सागर । लाटांचा जागर ।
मिठाचे आगर । हीच भूमी ।।
उतरते छत । नाचणीचे शेत ।
पिके खूप भात । खाचरात।।
इरले हो माथी ।कोयता रे हाती ।
भात मासे खाती । सर्वजण।।
सागरी किनारा । वाहे खारा वारा।
जलदांच्या धारा । अतोनात।।
कोळी फेकी जाळे।मासेमारी तळे।
फणसाचे मळे । या भूमीत ।।
तांबूस मातीचा। हिरव्या बागांचा ।
स्वर्ग हा सृष्टीचा । हे कोकण ।।