STORYMIRROR

yuvaraj jagtap

Tragedy Others

3  

yuvaraj jagtap

Tragedy Others

कोरोना

कोरोना

1 min
2.9K

निसर्गाची केली

खूप खूप हानी

आता रे दुःखाची

म्हणा तुम्ही गाणी


काय खावे याचे

राहिले न भान

विषाणू उडवी

भूक नी तहान


अन्नासाठी सारे

प्राणी केले फस्त

कोरोना करेल

जीनं उधवस्त


माणूस सोडून

खाता प्राणी सारे

कोरोना विषाणू

आता तुम्हा मारे


अन्नाची साखळी

केली खिळ खीळी 

निसर्ग बदला

पहा घेई बळी


कोणतीच लस

नाही याच्या साठी

सोडा मांसाहार

भाज्या घ्या पोटी


जीव घेणा रोग

आला तुम्हा दारी

निसर्गास जपा

नको रे गद्दारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy