STORYMIRROR

vanita shinde

Tragedy

5  

vanita shinde

Tragedy

दुष्काळ

दुष्काळ

1 min
572

जेव्हा कोपला निसर्ग

तेव्हा पडला दुष्काळ,

कशी आली आम्हांवर

किती वाईटही वेळ.


पाण्यासाठी वणवण

करी सारे पायपीट,

किती दमलो शिणलो

नाही सरतच वाट.


चा-यासाठी गोठ्यामधी

गुरं- ढोरं हंबरती,

फरपट जीवनाची

डोळे अश्रुने भरती.


शेतं पडली ओसाड

पिक नाही शिवारात,

झुरतोय बळीराजा

पोरं उपाशी घरात.


हाल सोसवेना आता

कसं सुटणारं कोडं,

घालतोयं तो आशेनं

देवालाच रे साकडं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy