STORYMIRROR

vanita shinde

Inspirational

3  

vanita shinde

Inspirational

आई

आई

1 min
302

आई माझी आहे 

जीवनाची सखी,

तिच्याविना जीवन 

हे वाटेल ग दु:खी.


जगण्याची एक 

तिच आहे आस,

तिच्या आनंदाचा 

मनी माझ्या ध्यास.


जन्म दिला तिने 

दाखविले हे जग,

संकटांची कधी नाही 

लागू दिली धग.


पदराच्या पंखाखाली 

तिच्या मला लपवून,

सदैवच केले तिने 

माझ्या जीवाचे रक्षण.


झरा वात्सल्याचा, 

मायेची ती खाण,

आई आहे माझ्या

 घराची ग शान.


माझ्या हृदयात आहे

आईचे अतूट स्थान,

जन्मभर तिचा ग

राखेन मी मान.

-----------------------


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational